Tiranga Times Maharashtra
लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेता जय भानुशाली आणि माही विज वेगळे झाले असून या घटस्फोटानंतर पोटगीच्या चर्चांना जोर आला होता. माहीने जयकडून तब्बल पाच कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र अखेर या चर्चांवर स्वतः माही विज हिने स्पष्ट भूमिका मांडली आहे. तिच्या युट्यूब व्लॉगद्वारे माहीने या सर्व अफवा खोट्या असल्याचं सांगत, आपण कोणतीही कोट्यवधींची पोटगी मागितलेली नसल्याचं ठामपणे स्पष्ट केलं. घटस्फोटानंतरही तिन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करणार असल्याचंही तिने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
माही विज आणि जय भानुशाली यांच्यातील घटस्फोटानंतर पाच कोटी पोटगीच्या चर्चांवर माहीने स्वतः खुलासा करत सत्य समोर आणलं.
