Tiranga Times Maharashtra
. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालांकडे लागलं आहे. मुंबई महापालिकेचा रिमोट पुन्हा मातोश्रीच्या हाती जाणार की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईचा किंग ठरणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
काल मतदानाच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीची पत्रकार परिषद घेत या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. बोटावरील शाई सुकल्यानंतर ती काढता येत नाही, मात्र लगेच पुसण्याचा प्रयत्न केला तरच ती निघू शकते, असं मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शाई पुसण्याच्या व्हिडीओंची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आता काही वेळातच पहिल्या फेऱ्यांचे कल समोर येणार असून मुंबईसह राज्यातील महापालिकांमध्ये सत्ता कुणाची हे स्पष्ट होणार आहे.
