Tiranga Times

Banner Image

मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार? फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, आता अडीच वर्षांचा…

मुंबईच्या राजकारणात महापौरपदाला विशेष महत्त्व असून, फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता महापौरपदाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 17, 2026

Tiranga Times Maharastra

 

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महायुतीने जिंकली असून, त्यानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून बहुसंख्य ठिकाणी भाजप आणि महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. मुंबईसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि मीरा-भाईंदर या महापालिकांमध्ये महायुतीने विजय मिळवला आहे.

मुंबई महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर महापौरपदावर कोण विराजमान होणार, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य करत सस्पेन्स काही अंशी दूर केला आहे.

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा असणार आहे. म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महापौरपदाची वाटणी करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

या विधानानंतर आता पहिल्या अडीच वर्षांसाठी कोणत्या पक्षाचा महापौर असेल आणि त्यानंतर सत्ता कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये लवकरच यासंदर्भात अधिकृत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Breaking News:

Recent News: