Tiranga Times

Banner Image

बॅचलर पार्टीत भयंकर घडलं, बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळलं, रात्रभर नाचगाण्याचा धिंगाणा, सकाळी… नागपूर हादरलं

#NagpurNews #BachelorPartyTragedy #NegligenceCase #ShockingIncident #CrimeUpdate #TirangaTimesMaharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 27, 2025

 

नागपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. मित्राच्या लग्नाच्या आनंदात आयोजित करण्यात आलेल्या बॅचलर पार्टीदरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका 33 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने माणुसकीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

माहितीनुसार, पार्टीदरम्यान संबंधित तरुण अचानक बेशुद्ध पडला. मात्र त्याला तात्काळ वैद्यकीय मदत देण्याऐवजी, उपस्थित मित्रांनी त्याला चादरीत गुंडाळून बाजूला ठेवले आणि रात्रभर नाचगाणे व दारूच्या धिंगाण्यात दंग राहिले. धक्कादायक बाब म्हणजे या मित्रांच्या गटात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीही होती.

रात्रभर कोणतीही मदत न मिळाल्याने सकाळी तो तरुण मृतावस्थेत आढळून आला. वेळेत उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tiranga Times Maharastra च्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. बेजबाबदार वर्तन किती प्राणघातक ठरू शकतं, याचं हे प्रकरण भयावह उदाहरण ठरत आहे.

Slug:
 

1 Line Brief:

Hashtags:
 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: