Tiranga Times Maharashtra
2017 मध्ये भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत यंदा काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये बसपानेही प्रभावी उपस्थिती दाखवल्याने निकाल अधिकच चुरशीचे ठरत आहेत.
विशेषतः नागपूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 24, 25 आणि 26 या प्रभागांचे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या प्रभागांमध्ये कोण बाजी मारतो, यावर अनेक राजकीय समीकरणं अवलंबून आहेत. प्रचारादरम्यान या तिन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन झालं होतं. स्थानिक मुद्दे, विकासकामं आणि उमेदवारांची वैयक्तिक पकड यामुळे मतदारांमध्येही मोठी उत्सुकता दिसून आली.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत चढ-उतार पाहायला मिळत असून काही ठिकाणी विजय-पराजयाचा फरक अत्यल्प असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर महापालिकेच्या सत्तासमीकरणात हे प्रभाग निर्णायक ठरू शकतात.
