राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असून इच्छुक उमेदवारांच्या चाचपण्या आणि बैठका सुरू आहेत.
अशा पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांना मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर “आता विसावू या वळणावर” अशा भावनिक पोस्टद्वारे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.
त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये यामुळे बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
