Tiranga Times Maharashtra
आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात सध्या पाकिस्तानचा तरुण फलंदाज समीर मिन्हास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मैदानात उतरला की चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू केवळ फलंदाजीसाठीच नाही, तर त्याच्या दमदार शरीरयष्टीमुळेही चर्चेत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात एकच प्रश्न विचारला जातोय—समीर मिन्हास नेमकं काय खातो?
समीर मिन्हास हा पाकिस्तानच्या अंडर-19 संघातील आक्रमक फलंदाज मानला जातो. त्याची ताकद, फिटनेस आणि मैदानावरील आक्रमक खेळ पाहता त्याच्या आहाराबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर आपल्या डाएटमध्ये प्रथिनांना विशेष महत्त्व देतो. तो प्रामुख्याने उंटाचं मांस (Camel Meat) खात असल्याचं सांगितलं जात आहे. उंटाच्या मांसामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असून चरबी कमी असते, त्यामुळे ताकद आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी ते उपयुक्त मानलं जातं.
पाकिस्तान आणि मध्य आशियातील काही भागात उंटाचं मांस नियमित आहारात वापरलं जातं. समीर मिन्हासही फिटनेस टिकवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी हा आहार घेतो, अशी चर्चा आहे. यामुळेच मैदानात त्याची फटकेबाजी अधिक प्रभावी आणि ताकदीची दिसते.
अंडर-19 विश्वचषकात समीर मिन्हासची कामगिरी पाहता तो भविष्यात पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठं नाव ठरू शकतो, असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
