Tiranga Times Maharastra
. “प्रिय आई बाबा, मतदानाच्या दिवशी वेळ काढा आणि मतदान करा” अशी साद थेट मुलांच्या माध्यमातून पालकांना घालण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत तब्बल १ लाख पालकांना त्यांच्या मुलांनी पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मुलांची ही भावनिक साद पालकांच्या मनाला भिडत असून, सोशल मीडियावर या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. पनवेलमध्ये यंदा विक्रमी मतदान होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
