कोरोनाने देशात मोठा कहर केला होता. शाळा बंद, घरून काम आणि अनेकांच्या नोकऱ्या जाणे असे गंभीर परिणाम त्यावेळी पाहायला मिळाले. आता त्यानंतर भारतासमोर आणखी मोठे आरोग्य संकट उभे राहिल्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील वाढते वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनला असून दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या विषयावर न्यायालयांकडूनही सरकारला फटकारले गेले असून अनेक ठिकाणी हवा आरोग्यासाठी घातक पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे.
Tiranga Times Maharastra यांच्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, कोरोनानंतर वायू प्रदूषण हे भारतातील सर्वात मोठे आरोग्य संकट ठरत आहे. वेळेत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतातील लाखो नागरिकांच्या फुफ्फुसांना आधीच गंभीर इजा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या माहितीमुळे आरोग्य तज्ज्ञांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
