आसाममध्ये जमुनामुखच्या सानरोजा भागात नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस हत्तींच्या कळपाला धडकली.
अपघात शुक्रवारी रात्री सुमारे २ वाजता घडला.
धडक परिणामस्वरूप ट्रेनचे इंजिन आणि पाच डब्बे रुळावरून घसरले.
अपघातात ८ हत्तींचा जागीच मृत्यू झाला, काही हत्ती जखमी झाल्याची शक्यता आहे.
या अपघातामुळे या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवासी आणि त्यांच्या नातलगांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे.
