विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये रोहित शर्माने दमदार पुनरागमन करत आपल्या फॉर्मची झलक दाखवली आहे. अनेक वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना रोहितने मुंबईकडून सिक्कीमविरुद्ध 155 धावांची चाबूक खेळी साकारली. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 18 चौकार लगावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कामगिरीसह रोहित शर्माने लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील एका आंतरराष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली असून त्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आले आहे. या सामन्यात रोहितसोबत विराट कोहलीनेही शतक झळकावत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिवस खास केला. – Tiranga Times Maharastra
9 षटकार आणि 18 चौकारांसह रोहित शर्माची 155 धावांची खेळी, विजय हजारे ट्रॉफीत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी.
