राज्यातील पोलीस प्रशासनात मोठा बदल होण्याची शक्यता असून सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक असलेले सदानंद दाते यांना महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने १६ डिसेंबर रोजी याबाबत प्रस्ताव मांडला होता. 1990 बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या दाते यांची कारकीर्द दहशतवादविरोधी कारवाया आणि संवेदनशील तपासासाठी ओळखली जाते. जानेवारी 2026 मध्ये सध्याच्या डीजीपींचा कार्यकाळ संपल्यानंतर सदानंद दाते यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. – Tiranga Times Maharastra
NIA प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे पुढील डीजीपी होणार का, प्रशासनात चर्चांना वेग.
