Tiranga Times Maharastra
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये एकाच विचारसरणीतील दोन गट एकत्र येण्याची शक्यता असून, सध्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील एका मंत्र्याने मोठे वक्तव्य करत, ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडीत सहभागी होऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना युतीकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने जागावाटपाबाबत सखोल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी कोणते प्रभाग सोडायचे आणि कोणते लढवायचे यावर विचारविनिमय केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित असून, उर्वरित काही जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल, असा विश्वास सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Tiranga Times Maharastra
#TirangaTimesMaharastra
#MaharashtraPolitics
#SharadPawar
#MunicipalElections
#PoliticalUpdate
#MarathiNews
