राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला सलग धक्के बसत असल्याचे चित्र आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांप्रमाणेच आता महापालिका निवडणुकांआधीही पक्षांतरांना जोर आला आहे.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांचा प्रवेश सुरू असून याचा फटका महाविकास आघाडीला बसत आहे.
ठाणे जिल्ह्यातून ठाकरे गटासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे.
माजी आमदार सुभाष भोईर उद्या भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
या घडामोडीमुळे शिवसेना ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
