Tiranga Times Maharashtra
‘बिग बॉस 16’चा फर्स्ट रनरअप शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर शिवचा लग्नमंडपातील फोटो तुफान व्हायरल होत असून, या फोटोमध्ये तो नवरा म्हणून तर त्याच्या शेजारी नवरीसोबत दिसत आहे. हा फोटो खुद्द शिव ठाकरेने शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. फोटो शेअर करताना शिवने कॅप्शनमध्ये फक्त “Finally…” असं लिहिल्याने अनेकांनी तो गुपचूप लग्नबंधनात अडकला की काय, असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र हा फोटो खरा लग्नाचा आहे की एखाद्या प्रोजेक्टचा भाग आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
