ठाणे, कल्याण आणि मुंबईत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. युतीची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून कल्याणमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. एकमेकांवर ‘युतीत पाठीत खंजीर खुपसल्याचे’ आरोप होत असून कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत नाराजी उघडपणे व्यक्त केली जात आहे. यामुळे महायुतीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडणुकीआधीच दोन्ही पक्ष आमने-सामने ठाकले आहेत. पुढील काळात हा संघर्ष कुठल्या वळणावर जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. – Tiranga Times Maharastra
