Tiranga Times Maharastra
गेल्या सुमारे दहा वर्षांपासून शुभांगी अत्रे ‘अंगुरी भाभी’ ही भूमिका साकारत होती आणि या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमही मिळत होते. त्यामुळे अचानक तिने मालिका सोडल्याने चाहत्यांना धक्का बसला.
शुभांगीने सांगितले की, वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कारणे आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमधील बदल यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. दीर्घकाळ एकाच भूमिकेत काम केल्यानंतर थोडा ब्रेक घेणे गरजेचे असल्याचेही तिने नमूद केले.
दरम्यान, यापूर्वी ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचा पुन्हा मालिकेत पुनरागमन होत असल्याने मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
