ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणातील समीकरणे बदलली असली तरी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाकडून १०० जागांची मागणी करण्यात आली असताना प्रत्यक्ष चर्चेत ७० जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला भाजपने कमी जागांचा प्रस्ताव दिल्याने नाराजी व्यक्त झाली होती, मात्र युती टिकवण्याच्या दृष्टीने भाजपने भूमिका बदलत ७० जागांचा पर्याय पुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. तरीही अंतिम फॉर्म्युला ठरत नसल्याने महायुतीत अस्वस्थता कायम आहे. – Tiranga Times Maharastra
