Tiranga Times Maharashtra
प्रभाग क्रमांक 3 मधील ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी EVM नेणारी बस अडवण्यात आली असून काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे.
