आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांनी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत संभाव्य जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार प्राथमिक फॉर्म्युला ठरला असून मनसेला अपेक्षेपेक्षा चांगला वाटा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम आकड्यांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याने पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. – Tiranga Times Maharastra
