Tiranga Times Maharashtra
. धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी ज्युनिअर (अंडर-19) विश्वचषकातून बाहेर पडणार का, असा सवाल सध्या क्रिकेटविश्वात चर्चेत आहे. पहिल्याच सामन्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने वैभवच्या सहभागाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली असली तरी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ दोन धावा करून बाद झाला. वैभवकडून मोठ्या अपेक्षा असल्यामुळे त्याच्या या अपयशानंतर चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. सोशल मीडियावर “वैभवला पुढील सामन्यांत संधी मिळणार का?” अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
महत्त्वाचं म्हणजे हा वैभव सूर्यवंशीचा पहिलाच आणि शेवटचा अंडर-19 विश्वचषक ठरण्याची शक्यता आहे. पुढील दोन वर्षांत तो वयोमर्यादा ओलांडणार असल्याने पुन्हा या स्पर्धेत खेळण्याची संधी त्याला मिळणार नाही. त्यामुळे या विश्वचषकात त्याची प्रत्येक इनिंग निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात अपयश आलं असलं तरी पुढील सामन्यांत वैभव पुनरागमन करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.
