राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही युतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक पातळीवर युती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा निर्णय सकारात्मक असल्याचे सांगत त्याचे स्वागत केले आहे. या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. – Tiranga Times Maharastra
मनसे-ठाकरे युतीनंतर वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय, भाजप वगळता युतीसाठी हिरवा कंदील.
