विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा पहिला दिवस पूर्णपणे फलंदाजांच्या नावे राहिला. 24 डिसेंबरला झालेल्या सामन्यांत तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावत देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी शतकी खेळी करत लक्ष वेधून घेतले. अनेक वर्षांनंतर रोहित आणि विराटचे या स्पर्धेत झालेले पुनरागमन विशेष ठरले. मात्र या सगळ्या चमकदार नावांमध्येही एका तुलनेने कमी चर्चेत असलेल्या फलंदाजाने द्विशतक झळकावत सर्वांनाच मागे टाकले आणि पहिल्या दिवसाची सर्वात भारी खेळी आपल्या नावावर केली. – Tiranga Times Maharastra
पहिल्याच दिवशी 22 शतकांचा पाऊस, पण एका द्विशतकवीराने रोहित-विराटलाही टाकलं मागे.
