फरार आर्थिक गुन्हेगार कायदा (FEO) अंतर्गत आपल्याला फरार घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाने चांगलेच झापले आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारतामध्ये परत येण्याच्या ठोस योजनांचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याशिवाय त्याच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही.
दिवाळखोर किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक असलेल्या मल्ल्याने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’च्या वैधतेला आव्हान दिले आहे. मात्र, देशाबाहेर राहूनच कायद्याला आव्हान देणे योग्य नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, FEO कायद्याला आव्हान देण्यापूर्वी मल्ल्याने वैयक्तिकरित्या भारतात हजर राहणे आवश्यक आहे. जोपर्यंत तो परत येण्याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही, तोपर्यंत त्याची याचिका ऐकली जाणार नाही, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.
